लंडन- युनिव्हर्सिटी ऑफ सरे मधील संशोधकांनी नुकत्याच केलेल्या ५जी इंटरनेट तंत्रज्ञान चाचण्यांत सेकंदाला १२५ गिगाबाईटचा वेग मिळविला असून या वेगाने १ सेकंदात ३० चित्रपट डाऊनलोड होऊ शकतील असे या संशोधकांचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ४ जी पेक्षा हा वेग ६५ हजार पट अधिक आहे.
फाईव्ह जी मुळे १ सेकंदात ३० चित्रपट डाऊनलोड
हे तंत्रज्ञान सरे विद्यापीठातील फाईव्ह जी इनोव्हेशन सेंटरने विकसित केले आहे. संशोधकांच्या मते या पूर्वी फायबर ऑप्टीक केबलमध्ये हा वेग मिळाला होता मात्र आता तो वायरलेस केबल मध्येही मिळाला आहे. यापूर्वी आक्टोबर २०१४ मध्ये ५ जी टेस्टींगमध्ये ७.५ जीबी स्पीड मिळाला होता. त्यावेळी हे संशोधन सॅमसंगने केले होते. आता सरे यांचे संशोधन पब्लीक झोनमध्ये २०१८ पासून सुरू करणार असून ५ जीचे ब्रिटीश रिलीज २०२० पर्यंत होईल असेही सांगितले जात आहे.
या संशोधनाचे प्रमुख प्रो. रहीम ताफाजोली म्हणाले की ५ जीचा हा स्पीड युजरपर्यंत जगात सर्वप्रथम पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न राहील.