६ भारतीय महिला फोर्ब्सच्या आशियातील उद्योगपतींच्या यादीत

forbes
न्यूयॉर्क – आशियातील ५० प्रभावशाली महिलांच्या यादीत भारतातील ६ महिला उद्योगपतींची नावे फोर्ब्स या मासिकात झळकली आहेत. यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य तसेच बायोकॉनचे किरण मुजुमदार शॉ यांचा समावेश आहे. भट्टाचार्य आणि शॉ यांच्या व्यतिरिक्त श्रीराम लाईफ इन्शुरन्स-श्रीराम कॅपिटलच्या मॅनेजिंग डायरेक्टर अखिला श्रीनिवासन, आयसीआयसीआय बँकेच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ चंदा कोचर, अॅक्सिस बँकेच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ शिखा शर्मा तसेच एलआयसीच्या मॅनेजिंग डायरेक्टर उषा संगवान यांचाही यादीत समावेश आहे.

Leave a Comment