मायक्रोसॉफ्टवरून फेसबुक, गुगल चॅटिंगची सुविधा बंद

microsoft
वॉशिंग्टन : मायक्रोसॉफ्टने वाढत्या स्पर्धेच्या जगात आपले वेगळेपण सिद्ध करण्यासाठी आपल्या प्लॅटफॉर्मवरून गुगल आणि फेसबुक चॅटची सुविधा बंद करण्यात येत असल्याची माहिती आऊटलुकच्या युजर्सना ई-मेलद्वारे दिली आहे. येत्या काही आठवड्यांत हा बदल आढळून येणार असल्याचेही पुढे म्हटले आहे.

हा निर्णय गुगलच्या एका विरोधी निर्णयामुळे घेतल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे. ऑनलाईन चॅटिंगसाठी पर्याय म्हणून मायक्रोसॉफ्टने आऊटलुकच्या सेवांचा पर्यायही आपल्या युजर्सना सुचविला आहे. ‘आम्हाला माहीत आहे की, आमचे काही ग्राहक या निर्णयामुळे नाराज होतील. मात्र आम्हाला आशा आहे की, ते स्काईपद्वारे चॅट, व्हॉईस, व्हीडीओ कॉलिंगच्या सेवेचा लाभ घेतील. त्यामुळे आपल्या मित्र आणि कुटुंबीयांच्या संपर्कात राहण्यासाठी तुम्ही या सक्षम पर्यायी मार्गांचा फायदा घेऊ शकता.’ असेही मेलमध्ये पुढे म्हटले आहे. या निर्णयामुळे तुमच्या फेसबुक आणि गुगलच्या नियमित सेवांच्या वापरावर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही पुढे म्हटले आहे. या सर्व प्रकारातून मायक्रोसॉफ्ट-गुगलचे पारंपारिक शत्र्रत्व पुन्हा एकदा नव्याने समोर आले आहे.

Leave a Comment