व्याघ्र गणनेत उणीवा; ‘ऑक्सफर्ड’ विद्यापीठाच्या अहवालातील माहिती

tiger
लंडन : एका गणनेनुसार सरकारने नुकतेचभारतात वाघांची संख्या वाढल्याचे जाहीर केले असले तरी त्यात वापरण्यात आलेल्या संशोधन पद्धतीत अनेक उणिवा होत्या, असे ऑक्सफर्ड विद्यापीठातील एका अभ्यास अहवालात म्हटले आहे.

संशोधकांचे म्हणणे असे आहे की वाघांची गणना करताना हमखास पाहणी पद्धतीत काही चुका होतात. ऑक्सफर्ड विद्यापीठ, भारतीय सांख्यिकी संस्था व वन्य जीवसंवर्धन संस्था यांनी या व्याघ्र गणनेतील चुका दाखवून दिल्या आहेत. आताच्या अभ्यासात म्हणजे राष्ट्रीय व्याघ्र पाहणीत वाघांची संख्या ४ वर्षांत ३० टक्के वाढल्याचा दावा करण्यात आला आहे.

२०१४ मध्ये वाघांची २२२६ होती व ती २०१० या वर्षांपेक्षा तीस टक्क्यांनी वाढली आहे, असा या पाहणीचा निष्कर्ष होता. ऑक्सफर्ड विद्यापीठातील वन्य जीवसंवर्धन संशोधन संस्थेचे प्रा. अर्जुन गोपालस्वामी यांच्या मते या व्याघ गणनेत वापरलेले नमुने फारच कमजोर होते व केवळ १० टक्के अनिश्चिततेतून त्यावर मोठा परिणाम होणार होता. त्यामुळे वाघांची संख्या वाढल्याचा निष्कर्ष भक्कम पाहणीच्या आधारे नाही. आम्ही केलेल्या प्रत्यक्ष चाचण्यानुसार ही पाहणी पद्धत अतिशय चुकीचे निष्कर्ष सांगणारी होती, त्यात इंडेक्स कॅलिब्रेशन ही पद्धत विश्वासार्ह असून अगदी कमी प्रदेशातील वाघांची संख्या त्यात जास्त अचूकतेने सांगता येते. अ‍ॅनिमल टड्ढॅक काऊंट ही पद्धत कमी खर्चिक व फार चुका होणारी आहे. त्यामुळे व्याघ्र गणनेच्या निष्कर्षांवर विश्वास ठेवणे कठीण आहे. वन्य जीव संस्थेचे व राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाचे सदस्य डॉ. उल्लास कारंथ यांनी सांगितले की, या गणनेत सांख्यिकीच्या चुका आहे. नमुना, अंशाकन व भाकीत या सर्व मुद्यांवर त्यात उणिवा आहेत.

Leave a Comment