फेसबुकने बग्ज् शोधण्यासाठी ३ मिलिअन खर्च केले

facebook
नवी दिल्ली – २०११ पासून आपल्या साईटवरील बग्ज् म्हणजेच तांत्रिक त्रुटी शोधण्यासाठी फेसबुकने तब्बल ३ मिलिअन (३० लाख रू.) खर्च केले असून विशेष म्हणजे यात सर्वात जास्त वाटा भारताचा असल्याचे दिसून आले आहे. फेसबुकचे ११ कोटींहून जास्त युझर्स भारतात आहेत. हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअरच्या त्रुटींमुळे साईट अपेक्षित कार्य करत नाही किंवा काहीवेळा कार्य करणे थांबविते. सॉफ्टवेअर कंपन्यांची अशा एरर्स किंवा बग्ज्‌ शोधण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असते. मात्र त्यातूनही काही त्रुटी राहून जातात. यावर उपाय म्हणून फेसबुकने जगभरातील युझर्स, प्रोग्रामर्सना बग्ज्‌ शोधण्यासाठी आवाहन केले होते. त्याला जगभरातून प्रतिसाद मिळत आहे. चालू वर्षात अशाप्रकारच्या सर्वाधिक १ हजार ३४३ बग्ज्‌ एकट्या भारतानेच शोधले आहेत. त्यामधून भारतीयांनी ८४ हजार रुपयांची कमाई केली आहे. भारताबरोबरच इजिप्त ८१, अमेरिका ६१, फिलिपाईन्सने २७ बग्ज्‌ शोधले आहेत.

फेसबुकवरील कोणत्याही युजरचे फोटो किंवा अल्बम त्याच्या परवानगीशिवाय काढून टाकणारा बग सुरक्षा संशोधक लक्ष्मण माथिया यांनी शोधला आहे. त्याबद्दल त्यांना साडे ७ लाख रुपयांचे पारितोषिकही देण्यात आले आहे.

Leave a Comment