आता मोझिला आणि ऑपेरावरही व्हॉट्सअप वेब उपलब्ध!

mozilla
व्हॉट्सअप ही मेसेजिंग आणि चॅट सेवा सुरवातीच्या काळात फक्त स्मार्टफोनपुरती मर्यादित होती. पण आता व्हॉट्सअपने आपला पसारा वाढवला असून व्हॉट्सअप हे मोबाईल अॅप आता ऑपेरा आणि मोझिला फायरफॉक्सवरही उपलब्ध होणार आहे. व्हॉट्सअॅपचे वेब व्हर्जन सुरू झाले तेव्हा ते फक्त गूगलच्या क्रोमपुरतेच मर्यादित होते. पण आता त्यामध्ये ऑपेरा आणि फायरफॉक्सची भर पडली आहे. व्हॉट्सअॅपच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ही माहिती जारी करण्यात आली आहे.

इंस्टंट मेसेजिंग अॅप म्हणून व्हॉट्सअॅप जगभरात प्रसिद्ध आहे. व्हॉट्सअॅप युझर्सची संख्या ७० कोटींच्या पुढे गेली आहे. व्हॉट्सअॅप युझर्स बऱ्याच काळापासून ही सेवा डेस्कटॉपवर उपलब्ध करून देण्याची मागणी करत होते.

ब्लूस्टॅक्ससारख्या काही अॅपच्या माध्यमातून डेस्कटॉपवर यापूर्वीही व्हॉट्सअॅप उपलब्ध होत असले तरी त्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. म्हणून व्हॉट्सअॅपने महिन्याभरापूर्वी फक्त गूगलच्या क्रोम ब्राऊसरवरच व्हॉट्सअॅप वेब ही सेवा उपलब्ध करून दिली. व्हॉट्सअप वेब ही सेवा सुरूवातीच्या काळात फक्त क्रोमवरच उपलब्ध असल्यामुळे डेस्कटॉपवर मोझिला किंवा अन्य ब्राऊसर वापरणाऱ्यांना फक्त व्हॉट्सअप वेबसाठी क्रोम ब्राऊसर सुरू करावे लागायचे. आता त्यांना दोन-दोन ब्राऊसर उघडून ठेवण्याची गरज भासणार नाही. कारण ऑपेरा आणि मोझिला फायरफॉक्सवर व्हॉट्सअॅपची मजा घेता येणार आहे.

Leave a Comment