अवकाशात भारताचे २७ उपग्रह कार्यरत

satelite
नवी दिल्ली : लोकसभेमध्ये देशात संपर्काचे जाळे उभारण्यात साह्यकारी ठरणा-या ११ उपग्रहांसह एकूण २७ उपग्रह सध्या कार्यरत असून पुढील महिन्यात आणखी एक उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांनी प्रश्नोत्तराच्या तासात पुढील महिन्यात प्रक्षेपित करण्यात येणा-या एका उपग्रहासह अजून तीन उपग्रह नियोजित आहेत, असे सांगितले. ‘भारताने अवकाश तंत्रज्ञानात वेगाने प्रगती केली आहे, त्यातही विशेषतः मागील सात-आठ महिन्यांमध्ये केली. आपण एव्हाना अवकाश तंत्रज्ञानातील जागतिक नेतृत्वांपैकी एक बनलो आहोत,’ असे सिंग म्हणाले. सार्क देशांसाठीही उपग्रह प्रक्षेपित करण्यामध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

Leave a Comment