लेनोवोने कंझ्युमर इलेक्ट्रोनिक्स शो २०१५ मध्ये सादर केलेल्या योगा तीन रेंजमधील योगा थ्री प्रो टॅब्लेट मुंबईत एका कार्यक्रमात सादर केला आहे. या टॅब्लेटची किमत १ लाख १४ हजार ९९० रूपये आहे.
लेनोवोचा योगा थ्री प्रो सादर
योगा थ्री प्रो टॅब्लेट योगा टू पेक्षा १७ टक्के अधिक स्लीम आहेच पण तो योगा टूपेक्षा वजनालाही १४ टक्के हलका आहे. १३.३ इंची क्यूएचडी स्क्रीन, एम ७० इंटेल कोर प्रोसेसर, ८ जीबी रॅम, ५१२ जीबीची हार्डडीस्क, आणि ७ तासांपेक्षा अधिक बॅटरी लाईफ अशी त्याची अन्य फिचर्स आहेत.