रेल्वे अर्थसंकल्पावर नाराज शिवसेना

shivsena
मुंबई – आज रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी मोदी सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर आणि राहुल शेवाळे यांनी या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच आले नसल्याने नाराजी व्यक्त केली.

या रेल्वे अर्थसंकल्पाकडून महाराष्ट्राला खूप अपेक्षा होत्या. परंतु त्यातील एकही गोष्ट या अर्थसंकल्पात पूर्ण झालेली दिसून आली नाही. मुंबई उपनगरीय रेल्वे समस्यांची याआधीच सुरेश प्रभु यांना माहिती देण्यात आली होती. परंतु या सर्व समस्यांकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काहीच मिळाले नसल्याची प्रतिक्रिया गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केली.