नासाच्या क्युरिओसिटी रोव्हरने काढली सेल्फी

rover
वॉशिग्टन – नासाने मंगळ मोहिमेवर रवाना केलेल्या मार्स क्युरीओसिटी रोव्हरने मंगळाच्या पृष्ठभागावर काढलेल्या सेल्फी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. रोव्हर मंगळावरील माऊंट शार्प येथे चढून जाऊन तेथील खडकांचे आणि मातीचे नमुने घेताना या सेल्फी काढल्या गेल्या आहेत. यात रोव्हर खडकाच्या अगदी टोकावर पोहोचलेला दिसत आहे.

रोव्हरने मंगळावरील माऊंट शार्प येथे अगदी उंचावर जाऊन तेथील नमुने घेतले आहेत. यामुळे खडकांची रचना, त्यांची संयुगे यांचा व्हर्टिकल प्रोफाईल तयार करणे शक्य होणार आहे. जानेवारी अखेर हे फोटो काढले गेले आहेत. यात रोव्हर मोहावी दोन साईटवर ड्रिलिंग करत असतानाचेही सेल्फी आहेत. या फोटोत टेलिग्राफ पीकसह अन्य साईटही दिसत आहेत.

Leave a Comment