रसायन शास्त्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार भारतीय वंशाच्या दासगुप्तांना

dasgupta
न्यूयॉर्क- भारतीय वंशाच्या पूर्णेंदू दासगुप्ता यांना प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या जे. कॅलविन गिडिंग्स पुरस्काराने अमेरिकेच्या केमिकल सोसायटीने सन्मानित केले आहे.

टेक्सास विद्यापीठामध्ये दासगुप्ता हे प्राध्यापक आहेत. रसायनशास्त्रामध्ये विश्लेषणात्मक कार्य करणाऱ्या तसेच रसायन शास्त्राच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहित करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. माझी ओळख संशोधनापुरती मर्यादित होती परंतु आपण ज्या विद्याशाखेत काम करतो त्याच्या प्रेमाखातर जर पुरस्कार मिळत असेल तर मला त्याचा खूप आनंद आहे या शब्दांत त्यांनी आपले मनोगत प्रकट केले. माझे वडिल आणि आजोबा हे देखील विश्वविद्यालयात शिक्षक होते मी त्यांचीच परंपरा पुढे नेत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment