फेसबुकचे स्टिकर फॉर मेसेंजर अॅप

facebook
फेसबुकने नुकतेच अँड्राईड व आयओएस अॅप अपडेटची सुरवात केली असून त्यात नवे फिचर समाविष्ट केले आहे. यामुळे युजर आपले फोटो अपडेट करताना स्टीकर्सही चिकटवू शकणार आहेत. युजरला फोटो अपलोड करताना नवा स्टीकर आयकॉन दिसेल त्याच्या सहाय्याने स्टीकर्स चिकटविता येणार आहेत.

युरजला स्टीकर लहान मोठा करणे, रोटेट करणे, कोणत्याही जागी प्लेस करणे,एकाच फोटोत अनेक स्टीकर्स लावणे अथवा ती डिलिट करणे या सर्व सुविधा या अॅपमध्ये दिल्या गेल्या आहेत. स्टीकर अॅपची जाहिरात सध्या जोरात केली जात असून यासाठी फेसबुक मेसेंजर असणे मात्र आवश्यक आहे. यामध्ये कॅप्शन टाकण्याची सोयही युजरला उपलब्ध करून दिली गेली आहे. यात असलेल्या इन बिल्ट कॅमेर्‍यामुळे फोटो काढण्यापूर्वीही युजर स्टीकर लावू शकेल तसेच या अॅपमध्ये डिसलाईक स्टीकरही दिला गेला आहे. हे अॅप अजून भारतात मात्र उपलब्ध झालेले नाही.

Leave a Comment