१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यमंडळातर्फे समुपदेशनाची विशेष सोय

board
पुणे – फेब्रुवारी/मार्च २०१५ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा २१ फेब्रुवारी ते २६ मार्च २०१५ या कालावधीत तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षा ३ ते २६ मार्च २०१५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.

परिक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परिक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्यास राज्यमंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त समुपदेशक परीक्षा कालावधीत सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीतच विद्यार्थ्यांना समुपदेशन करतील. परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंबंधीत प्रश्न इत्यादीबाबत विद्यार्थी, पालक यांनी विचारणा करू नये, असे कृष्णकुमार, सचिव राज्यमंडळ, पुणे यांनी कळविले आहे.

भ्रमणध्वनी क्रमांक – ९९२२४५३२३५, ९८५०२४६३८९, ९७६३६६७४१६, ९४२२०५३३९१, ९८९०१४४१८५, ९८२२७१३९९५, ९९६०७६०११४, ९८९००५४५१८, ९९२३६८८१९१, ९७६६६६६०९४

Leave a Comment