भारताला आता मलेरियाचा धोका

maleria
लंडन : म्यानमार आणि भारताच्या सीमेवर औषधांचा परिणाम न होणारे मलेरिया रोगाचे विषाणू सापडल्याने भारताला मोठा धोका निर्माण झाला असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. सध्याची मलेरियावरील उपचारपद्धती कुचकामी असल्याने हजारो नागरिकांचे आयुष्य पणाला लागल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मलेरियावर उपचार करण्यासाठी भारतात वापरल्या जाणा-या औषधांना प्रतिकार करण्याची क्षमता असलेले विषाणू पसरत असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे. हे विषाणू आशियातून आफ्रिकेत पसरल्यास अथवा पूर्वीप्रमाणे आफ्रिकेत स्वतंत्रपणे पसरल्यास लाखो माणसांचा जीव जाण्याची भीती असल्याचे त्यांनी सांगितले. म्यानमारमधील ५५ मलेरिया उपचार केंद्रांमधून

गोळा केलेल्या या विषाणूंची वाढ ही विशिष्ट प्रदेशातच होत असल्यासंदर्भात अभ्यास केला. हे विषाणू भारतीय हद्दीच्या फक्त २५ कि. मी. दूरपर्यंत असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment