न्यूयॉर्कमध्ये सोशल साईटसवरील लाईक्सचा नोकरीवर परिणाम

social-sites
कॅलिफोर्निया : तुम्ही सोशल साईटसवर केलेल्या लाईक्सचाही नोकरीवर ठेवताना आता पारंपारिक रिझ्युमवर परिणाम होणार आहे. न्यूयॉर्कमधील नोकरीसाठी सल्ला देणा-या फहरेनहिट २१२ या संस्थेने अलीकडेच ही पद्धत अवलंबिण्यास सुरुवात केली आहे.

पारंपारिक रिझ्युमवरून माहिती घेण्याशिवाय एखाद्या उमेदवाराचा समग्र दृष्टिकोन समजून घेण्यासाठी फेसबुक, लिंक्डइन अशा सोशल नेटवर्किंग साईटवरील माहितीचाही उपयोग करून घेण्यात येत आहे.’ असे पीटर मौलिक या सोशल नेटवर्किंगवरील घडामोडींच्या अभ्यासकाने म्हटले आहे. स्टॅण्फोर्ड विद्यापीठातील प्राध्यापक मिचेल कासिनस्की यांनी तर त्यासाठी खास संगणकीय मॉडेल तयार केले आहे. त्यामध्ये फेसबुकवरील उमेदवाराने लाईक केलेल्या विविध पोस्टस, व्हीडीओज तसेच स्टेटस अपडेटसचाही अभ्यास करण्यात येणार आहे. त्यावरून उमेदवाराची दृष्टी समजण्यास मदत होणार असल्याचेही म्हटले आहे. याबाबत त्यांनी ८६ हजार फेसबुक युजर्सचा अभ्यास केला. त्यावरून ज्या लोकांना ‘शेक्सपिअर’ आणि ‘२००१ : ए स्पेस ओडिसी’ या दोन गोष्टी ज्यांना आवडतात त्या व्यक्ती अधिक सृजनशील असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. याशिवाय अनेक छोटे-मोठे निष्कर्षही काढण्यात आले आहेत.

अशा प्रकारे एखाद्याची दृष्टी तपासण्याबाबत तज्ज्ञांनी गोपनीयतेविषयी चिंता व्यक्त केली आहे. मात्र सोशल साईटसवर लाईक वगैरेंसारख्या गोष्टी सार्वजनिक रीत्या उघड केलेल्या असल्याने हे फार अवघड नसल्याचे संशोधकांनी म्हटले आहे तसेच सहजच लाईक करण्यावर नियंत्रण ठेवण्यास प्रतिबंध करता येईल, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

Leave a Comment