मोटोरोलाचा महागडा मोटो मॅक्स भारतात लाँच होणार

moto-max
मोटोरोलाने त्यांच्या सर्वात महागडा मोटो मॅक्स स्मार्टफोन भारतात लाँच करण्याची तयारी केली असल्याचे संकेत मोटोरोलाचे रिटेल भागीदार फ्लिपकार्ट ने सोशल नेटवर्कवर दिले आहेत. अर्थात या स्मार्टफोनचे नांव जाहीर केले गेले नसले तरी त्याची जी जाहिरात केली जात आहे त्यावरून तो मोटो मॅक्सच आहे असा तज्ञांचा तर्क आहे.

टर्बो चार्ज्ड, अक्सेलरेटेड परफॉर्मन्स, नॉयलॉन ड्युरेबल मटेरियल या टर्मचा वापर जाहिरातीत करण्यात आल्याने हा फोन मॅक्सच आहे असे सांगितले जात आहे. कारण मोटो मॅक्समध्येच बॅलेस्टीक नायलॉनचे ड्युरेबल मटेरियल वापरले गेले असून त्यामुळे फोनचे टेक्स्चर एकदम वेगळे आणि रंग अगदी रिच दिसतो. याखाली वापरले गेलेले ड्युपाँट फायबरचे लेअर स्टीलपेक्षा पाचपट मजबूत समजले जाते. याशिवाय या फोनमध्ये वॉटर रिपेलंट नॅनो कोटिंग, कॉर्निंग गोरिला ग्लास ३ अशीही फिचर्स आहेत. हा फोन अमेरिकेत यापूर्वीच लाँच झाला असून त्याला ५.२ इंची् अमोलेड डिस्प्ले, ३ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल मेमरी, अँड्राईड किटकॅट ४.४, ते कदाचित ५.० लॉलीपॉपमध्ये अपग्रेड करण्याची सुविधा, २१ एमपीचा रियर तर २ एमपीचा सेल्फी कॅमेरा, थ्रीजी, वायफाय, ब्ल्यू टूथ, फोर जी कनेक्टीव्हिटी अशी फिचर्स आहेत.

या स्मार्टफोनमध्ये टर्बो चार्जिगची खास सुविधा असून यामुळे १५ मिनिटे चार्जिंग केल्यास ८ तास हा फोन वापरता येतो. याची किंमत ४९ हजार रूपये आहे असेही समजते. नोव्हेंबर २०१४ मध्ये तो ब्राझीलमध्ये लाँच केला गेला आहे.

Leave a Comment