पुण्यात भाजप आमदाराला स्वाईन फ्लूची लागण

medha
पुणे – स्वाईन फ्लूची साथ देशभरात जोर पकडत असून स्वाईन फ्लू संक्रमित रुग्णांची संख्या पुण्यामध्येही झपाट्याने वाढत आहे. आता त्यात भाजपच्या कोथरुड मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णीं यांचीही भर पडली आहे. त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. मागील चार दिवसांपासून शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील आयसोलेशन वोर्डमध्ये त्या उपचार घेत असून त्याच्या प्रकृतीत सुधार येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

देशभरात स्वाईन फ्लू बळींची संख्या झपाटयाने वाढत आहे. मागील तीन दिवसांत देशभरात स्वाईन फ्लूने १०० जणांचा बळी गेला आहे तर पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात तिघांचा बळी गेल्यामुळे २००९ नंतर नागरिकांमध्ये पुन्हा एकदा स्वाईन फ्लूची दहशत दिसत आहे. वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्लूचे विषाणू पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस उपलब्ध असली तरी ती सरकारी रुग्णालयात उपलब्ध नाही. खासगी रुग्णालयात ती सर्व सामान्यांच्या अवाक्याबाहेरील किंमतीत उपलब्ध आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment