भीतरकनिका पार्कमध्ये डॉल्फिन संख्या वाढल्याने अभ्यासक आनंदी

bhitarkanika
केंद्रपाडा : सहा विविध प्रजातींचे २८० डॉल्फिन येथील ‘भीतरकनिका नॅशनल पार्क’ मध्ये झालेल्या गणनेमध्ये आढळून आले असून डॉल्फिनची संख्या मागील वर्षीच्या तुलनेमध्ये वाढल्याने सागरी अभ्यासकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बॉटलनोज, सौसा चिनेनसिस, सौसा प्लमबिया, स्पॉटेड डॉल्फिन, इर्रावॅड्डी आणि फिनलेस आदी प्रकारचे डॉल्फिन मासे आढळून आले आहेत. या डॉल्फिन गणनेमध्ये ३१ तज्ज्ञ सहभागी झाले होते.
भीतरकनिकामधील तळी, नद्या, समुद्र किना-यांवर ही पाहणी करण्यात आली होती, अशी माहिती डॉल्फिन संशोधक मुमताज खान यांनी दिली.

दरम्यान, म्हाकालापाडा झोनमध्ये संशोधकांच्या पथकाला एकही डॉल्फिन आढळून आलेला नाही. कनिका जंगल परिसरामध्ये कालीभंजदिहामध्ये इर्रावेड्डी डॉल्फिन आढळून आले असून, हान्सुआ ते खोला नदीमध्ये फिनलेस पॉरपाईज प्रजातीचे डॉल्फिन आढळून आले आहेत. राजनगर वन परिक्षेत्रामध्ये हनसिना ते माहीपुरा या नदीपात्रामध्ये पॉरपाईज प्रजातीचे डॉल्फिन मासे आढळून आले आहेत, अशी माहिती वनअधिका-यांनी दिली.

Leave a Comment