तुमच्या हातातला लहान कम्प्युटरच आहे अँड्रोमियम – !

andromium
स्मार्टफोनच्या तंत्रज्ञानात रोजच्या रोज होणारे बदलाने ते हातातील कॉम्प्यूटरसारखेच उपकरण झालेले आहे. भलेही त्यामध्ये कॉम्प्युटरइतक्या सुविधा म्हणजेच गेमिंग कन्सोल त्याचबरोबर जास्त क्लिष्ट अप्लिकेशन्स नसतीलही तरीदेखील हा स्मार्टफोन आपल्याला एखाद्या कॉम्प्युटरसारखा उपयोगी पडतो.

ॲण्ड्रोमियम हे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर याचा उत्कृष्ट सुवर्णमध्य आहे. यासाठी आपल्याला करायचे ते एकच आहे ते म्हणजे एक चार्जिंग क्रॅडल ज्याने ॲण्ड्रोमियम ऑपरेटींग सिस्टम गुगल प्लेवरुन आपल्या फोनवरती डाऊनलोड करुन घ्यावयाची आहे. क्रॅडलच्या माध्यमातुन आपला फोन आणि कॉम्प्यूटरची मोठी स्क्रीन हे जोडुन घ्यावे लागते.

या उपकरणामध्ये व आधी तयार केलेल्या उपकरणांमध्ये जे बाजारात काही कारणांनी बाजारात लोकांचे लक्ष वेधु शकले नाहीत. उदा. मोटरोल, उबंटूएज, वेबटॉप, हे जरी कमी पडले असले तरी ॲण्ड्रोमियमचा आपण कोणत्याही ॲण्ड्रॉईड फोनवर आपण याचा वापर करु शकता. हीच याची खासियत आहे. यासाठी ब्रँडेड फोनची गरज नाही.

जे ग्राहक कोणत्याही प्रकारचा उच्च दर्जाचा स्मार्टफोन वापरत असतील त्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान गरजेपेक्षा जास्त उपयुक्त ठरणार आहे. हे तंत्रज्ञान अशा लोकांसाठी सुध्दा उपयुक्त आहे, जे कमी खर्चामध्ये कॉम्प्युटरचा वापर करु इच्छितात.

जरी कॉम्प्युटरसाठी हा पर्याय ठरु शकत नसेल व त्याचबरोबर याला विकत घेणाऱ्यांची संख्याही कमी असेल. पण हे तंत्रज्ञान आशिया, आफ्रिका आणि
दक्षिण अमेरीका या देशातील लोकांसाठी खास करुन शालेय विद्यार्थ्यांसाठी जास्त उपयुक्त ठरेल. हे तंत्रज्ञान खुपच स्वस्त असल्याकारणाने व याचा स्विकार जर जास्त लोकांनी केला तर याच्या किमती अजुन कमी होण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे या तंत्रज्ञानामुळे कॉम्प्युटर व स्मार्टफोन यातील अंतर निश्चितच कमी होणार आहे.

Leave a Comment