मोटरसायकलच ,किंमत अवघी पावणेदोन कोटी

feline
स्विस कंपनी फेलाईन मोटरसायकल्स आणि फेमस डिझायनर याकोबा यांनी मिळून जगातील सर्वात महागडी मोटरसायकल तयार केली असून तिची किंमत आहे २,८०,००० डॉलर्स म्हणजे जवळजवळ पावणे दोन कोटी रूपये. अशा प्रकारच्या फक्त ५० मोटरसायकलीच ही कंपनी बाजारात आणणार आहे.

ही मोटरसायकल केवळ मोटरसायकल नाही तर त्याहूनही अधिक कांही आहे असे डिझायनर याकोबाचे म्हणणे आहे तर कंपनीच्या मते ही भविष्यातील बाईक आहे. कार्बन, टायटेनियम, एअरोस्पेस अॅल्युमिनियम आणि उच्च दर्जाचे लेदर यांचा वापर यात करण्यात आला आहे आणि ती बनविण्यासाठी चार वर्षे लागली आहेत. ३ सिलींडर असलेले ८०१ सीसी पॉवर इंजिन, ६ स्पीड गिअर बॉक्स, १७० बीएचपी पॉवर असलेली ही बाईक दिसायला सुंदर आणि मजबूत आहेच पण इतके असूनही तिचे वजन फक्त १५५ किलो आहे.

पुढच्या वर्षात म्हणजे २०१६ सालच्या सुरवातीच्या महिन्यात ही बाईक बाजारात येणार आहे.

Leave a Comment