मंगळावर जाणाऱ्यांच्या यादीत ३ भारतीयांची निवड

mars
लंडन : मंगळावर वसाहत करण्यासाठी १०० लोकांची निवड करण्यात आली असून यामध्ये ३ भारतीयांचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यात दोन महिला असून एक पुरुष आहे. २०२४ मध्ये यातील पहिले चारजण मंगळावर जातील. मंगळावर जाणारी ही खाजगी सहल असून, त्याअंतर्गत एकदाच मंगळावर जाण्याची सोय आहे.

२०२,५८६ लोकांनी मंगळावर वसाहतीसाठी जाण्यास इच्छुकांनी अर्ज केले होते. त्यातील १०० जणांची निवड करण्यात आली असून, निवड झालेल्या लोकांना सध्या अंतराळात जाण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असून नेदरलँडमधील विनानफा तत्वावर काम करणारी संघटना मार्स वन तर्फे ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत मंगळावर मानवी वसाहत वसविण्यात येणार असून, त्यासाठी ४० लोकांना मंगळावर कायमचे राहण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. अंतिम निवड झालेल्या लोकांना सात वर्षे प्रशिक्षण दिले जाणार असून, २०२४ पासून दर वेळी चारजण याप्रमाणे लोक पाठविले जातील. मार्स १०० राऊंडमध्ये भारताचे तीन सदस्य आहेत. या १०० सदस्यात ३९ अमेरिकन असून, ३१ युरोपमधील आहेत. १६ अशियन असून, ७ आफ्रिकेतील आहेत तर ७ ओशियानातील आहेत.

मंगळावर कायमचे जाण्याची तयारी असणाऱ्या भारतीय नागरिकांत तरणजित सिंग भाटिया (२९)- सेंट्रल फ्लोरिडा विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्सची डॉक्टरेट करीत आहेत. दोन भारतीय महिलांपैकी रितिका सिंग (२९) या दुबईत राहत असून श्रद्धा प्रसाद (१९) ही केरळमधील युवती आहे.

Leave a Comment