मायक्रोसॉफ्ट ल्युमिया १३३० लवकरच भारतात

lumia1330
मायक्रोसॉफ्टचा ल्युमिया १३३० फॅब्लेट स्मार्टफोन लवकरच भारतात सादर होत असल्याचे संकेत दिले गेले आहेत. हा फोन ३ रंगात आणि दोन व्हेरियंटमध्ये सादर केला जाईल असे समजते.

आयात कागदपत्रांमधून मिळालेल्या माहितीनुसार मायक्रोसॉफ्ट ८००० युनिट भारतात आणणार आहे. याचाच अर्थ हा फोन भारतात प्रथम सादर केला जाईल अथवा २ मार्चच्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस इव्हेंटनंतर लगेच बाजारात उतरविला जाईल असे तज्ञांचे म्हणणे आहे. हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये येणार आहे. पैकी एक ड्युअल सिम तर दुसरा फोर जी कनेक्टीव्हीटीसह वन सिम स्लॉटमध्ये असेल.

या स्मार्टफोनसाठी स्नॅनड्रॅगन ४०० फॅमिली चीपसेट, १ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल स्टोरेज असेल. याला मायक्रोएसडी कार्ड दिले जाणार नाही. फोनची किमत असून जाहीर केली गेलेली नाही.

Leave a Comment