पुरूषांसाठीही गर्भनिरोधक गोळ्या

male
संतती नियमनासाठी आजपर्यंत महिला वर्गालाच गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध होत्या. मात्र आता लवकरच पुरूषांसाठीही अशा गोळ्या बाजारात येणार असल्याचे सांगितले जात आहे. एचटू गॅमेंडाझॉल पासून बनविल्या गेलेल्या या गोळ्या बायोलॉजिस्ट जोसेफ टॅश यांनी दीर्घ संशोधनातून तयार केल्या असून त्याचे उंदरावरचे प्रयोग यशस्वी ठरले आहेत.

संतती नियमनासाठी महिलांना घ्याव्या लागणार्‍या गोळ्यांचे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात हे पूर्वीच सिद्ध झाले आहे. पुरूषांसाठी फक्त कंडोमचा पर्याय आत्तापर्यंत होता मात्र तो १०० टक्के खात्रीलायक नाही. त्यामुळे पुरूषांसाठी गर्भनिरेाध करणारे कांही औषध बनविता येईल काय यासाठी टॅश केली १५ वर्षे सातत्याने संशोधन करत होते. त्यातून या गोळ्यांची निर्मिती झाली आहे. या गोळ्या घेतल्यामुळे पुरूषांच्या वीर्यातील शुक्राणू अर्धमेले होतात व त्यामुळे फलन प्रक्रिया होऊ शकत नाही.

जेक्यू १ असे दुसरेही औषध तयार करण्यात आले असून याच्या सेवनामुळे पुरूषांमध्ये शुक्राणू बनविण्याची प्रक्रिया करणार्‍या पेशी हे कार्यच विसरतात. परिणामी शुक्राणू निर्मिती होत नाही व त्यामुळे गर्भधारणेचा धोका राहात नाही. याचा प्रत्यक्ष सेक्सवर कोणताही विपरित परिणाम होत नाही असाही दावा करण्यात आला आहे. या औषधांचे उंदरांवर केले गेलेले प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर आता मानवांवर त्यांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत व त्यानंतर ते प्रत्यक्षात बाजारात उपलब्ध होऊ शकणार आहे.

Leave a Comment