नथुला मार्गे कैलास साठी पहिला जथा २१ जूनला जाणार

kailas
गंगटोक -तिबेट क्षेत्रातून कैलास मानसरोवर यात्रेसाठी यंदा प्रथमच नथूला मार्गे ५० भाविकांचा जथा २१ जूनला रवाना होणार आहे. सिक्किम पर्यटन आणि नागरी उड्डाण सचिव सी. जांगपो यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले पूर्व सिक्कीम मधील भारत चीन सीमेवर असलेल्या १४५०० फूट उंचीवरील नथूला खिंडीतून कैलास मानसरोवर यात्रेसाठी हा मार्ग २० जून रोजी औपचारिक रित्या खुला केला जाणार आहे. या मार्गाने भाविकांची पहिली तुकडी २१ जूनला रवाना होईल. या तुकडीबरोबर पाच सपोर्ट स्टाफ आणि १ पीआरओ असतील.

या यात्रेसाठी जाऊ इच्छीणार्‍यांना अर्ज भरावे लागणार आहेत. हे अर्ज विदेश मंत्रालयाच्या वेबसाईटवर ऑनलाईन भरता येणार आहेत. सिक्कीम पर्यटन विकास महामंडळावर राज्यातील प्रवासाच्या समन्वयाची जबाबदारी दिली गेली आहे. चीनच्या हद्दीत तेथील अधिकारी यात्रेकरूंना मार्गदर्शन करणार आहेत. आजपर्यंत कैलास यात्रेसाठी नेपाळ उत्तराखंड मार्गाने जावे लागत असे. हे मार्ग अतिशय खडतर आहेत. मात्र नथूला मार्गे थेट वाहनाने जाता येणार असल्याने हा मार्ग यात्रेकरूंचा वेळ, पैसा आणि कष्ट वाचविणार आहे.

Leave a Comment