स्मार्टफोनमुळे रोगप्रतिकारक शक्ती होते कमी

smartphone
लंडन : वायरलेस इंटरनेट आणि स्मार्टफोन्सचा वापर करून आपल्या लोकांनी कशासाठीही, केव्हाही, कुठेही, नेहमी संपर्कात राहणे-कधीही इतके सोपे नव्हते. पण आता परिस्थिती अशी आहे की फोन नसेल तर आपल्याला चुकल्यासारखे होते. मोबाईलच नव्हे तर एकूणच तंत्रज्ञानाच्या आपण आहारी गेल्याचे एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. भारतात ९७ कोटी लोक मोबईल वापरतात. अर्थात ९७ कोटी लोकांवर या तंत्रज्ञानाचा परिणाम होतो. त्यातून होणारे आरोग्यचे प्रश्नही उदभवतात.

मात्र यामुळे आपलं काम कितीही सोपं होत असलं तरी प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात त्याप्रमाणे एका चांगल्या बाजूबरोबर वाईट बाजूही असते. संशोधन म्हणतं की युनायटेड स्टेट्सच्या तुलनेत, सेल्युलर टॉवर्स आणि मोबाईल फोन्सपासून होत असलेल्या विद्युतचुंबकीय किरणोत्सर्गाशी एका सामान्य भारतीय माणसाला होणा-या संसर्गाची पातळी ५-१० पट जास्त आहे. किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे होणा-या नुकसानांमध्ये डीएनएची हानी, स्वत:ची दुरुस्ती करण्यात असमर्थ ठरणे, रोग प्रतिकारशक्ती कमी होणे, मेलाटोनीन पातळी कमी होणे, पेशींना हानी पोहोचवणे आणि यांसारख्या इतर बाबींचा समावेश आहे असे या क्षेत्राच्या संशोधनात आढळून आलं आहे. उत्सर्जनाच्या पेशींकडे आकर्षित होण्यामुळे शुक्राणू, ओव्हरी आणि वाढत्या गर्भास सर्वात जास्त हानी पोहोचते. परिणामी कर्करोग, नव्र्हस डिसऑर्डर आणि अगदी वंध्यत्वदेखील येऊ शकते.

क्लिनिकल डेटाप्रमाणे सुमारे १५ टक्के भारतीय जोडपी वंध्यत्वाच्या कुठल्या तरी स्वरूपाने पीडित असतात. संशोधनात असं देखील कळून आलं आहे की, पुरुषांमध्ये मोबाईल फोनच्या वापरामुळे शुक्राणूंची संख्या, त्याची हालचाल तसेच त्यांच्या शब्दरचना शास्त्रावरदेखील प्रभाव पडू शकतो. गरोदर स्त्रिया व त्यांच्या गर्भस्त अर्भकावरही सेल्युलर किरणोत्सर्गाचा प्रभाव पडू शकतो असंही संशोधनात आढळून आलं आहे.

गरोदरपणाच्या सरत्या काळात किरणोत्सर्गाच्या संर्सगामुळे अर्भकाच्या पाठीच्या कण्यास इजा होऊ शकते. बहुतेक मोबाईल्समधून ८२५ आणि ९१५ मेगाहट्र्ज च्या मध्ये रेडिओ फ्रीक्वेन्सीची देवाण-घेवाणही होत असते. या रेडिओ तरंगाचे उत्सर्जन मोबाईल हँडसेट व बेस स्टेशन अशा दोन्ही ठिकाणांहून होते. ज्याप्रमाणे मायक्रोव्हेवमध्ये खाद्यपदार्थाना गरम करण्याची क्षमता असते तशीच रेडिओ फ्रीक्वेन्सीमध्ये मानवी स्नायूंना उष्णता प्राप्त होते.
रेडिओ तरंगांमुळे निर्माण झालेल्या विद्युतचुंबकीय क्षेत्राद्वारे उत्पन्न होणा-या थर्मल (औष्णिक) प्रभावामुळे शरीराच्या ध्रुवीय परमाणूमध्ये डायइलेक्ट्रिक उष्णता निर्माण होते, ज्यामुळे जिवंत पेशी मरून जातात. ओहियो स्टेट युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसिनने आयोजित केलेल्या एका अध्ययनाद्वारे हे स्पष्ट झाले आहे की सेलफोन टॉवरच्या १०० मीटरच्या परिसरात राहाणा-या स्त्रियांमध्ये जास्त मानसिक ताण व वंध्यत्वाची दुप्पट शक्यता असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment