फुग्यांच्या साहाय्याने इंटरनेट सेवा पुरविणार गूगल

google
नवी दिल्ली : फेसबुकच्या मार्क झुगरबर्गने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी डिजीटल इंडिया प्रकल्पात सहभागी व्हायचे ठरविल्यानंतर फेसबुकसह अन्य काही साईट्स मोबाईल स्मार्टफोनवर मोफत पाहण्यासाठी रिलायन्स आणि फेसबुकने योजना तयार केली. त्यासाठी इंटरनेट डॉट ओआरजी हे अ‍ॅपही लाँच झाले. भारतातील या महत्वपूर्ण घडामोडीनंतर इंटरनेट क्षेत्रातील जायन्ट सर्च इंजिन समजल्या जाणा-या गूगलनेही कात टाकत भारतासाठी नवी योजना आणायची तयारी सुरू केलीय. ही योजना आहे, अतिशय उंचावर हवेत सोडलेल्या फुग्यांच्या सहाय्याने दुर्गम खेडोपाडी तसेच जिथे फोनची वायरही टाकण्यात आलेली नाही, अशा ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्याची योजना आखली आहे.

भारतात सध्या ३० कोटींपेक्षाही जास्त इंटरनेट ग्राहक आहेत. त्यातही बहुतांश शहरी आणि निमशहरी भागात आहेत. भारतात मेट्रो किंवा बडी शहरे किंवा महानगरे वगळता अन्यत्र कुठेही समाधानकारक स्पीडमध्ये इंटरनेट उपलब्ध होत नाही. त्यावर मात करण्यासाठीच गूगलने आकाशातील बलूनच्या सहाय्याने इंटरनेट सेवा पोहोचवण्याची योजना आखली आहे.

फुग्यांच्या सहाय्याने इंटरनेट सेवा पुरवण्याच्या गूगलच्या योजनेला लून प्रकल्प असं नाव आहे. गेल्यावर्षी न्यूझिलंडमध्ये हा प्रकल्प यशस्वीरित्या रावबण्यात आला आहे.. आकाशात अंदाजे २० किलोमीटरपर्यंत फुगे सोडण्यात येतात. त्यावर इंटरनेटला आवश्यक असलेली (सॅटेलाईटसारखी) सामुग्री असते. यामुळे २० किमीच्या परीघात जमिनीवर इंटरनेट सेवा पुरवता येते. अरवी सॅटेलाईट जे काम करते, तेच आता आकाशातील हे फुगे (बलून्स) करतात.

Leave a Comment