बर्ड फ्लू प्रसारास स्थलांतरीत पक्षी कारणीभूत

birds
जगात विविध प्रकारच्या बर्ल्ड फ्यूचा उद्रेक होण्यास स्थलांतरीत पक्षी आणि प्रवासी पक्षी कारणीभूत असल्याचे नेदरर्लंडच्या इरास्मस मेडिकल सेंटरमधील वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे भविष्यात ज्या देशांकडे बर्ल्ड फ्ल्यूच्या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी पुरेशी आणि सक्षम यंत्रणा नाही त्या देशातील पोल्टी फार्म संकटात येतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात असे दिसले आहे की रशियातील जंगली पक्षी आणि स्थलांतर करणारे पक्षी यांच्यात एच फाईव्ह विषाणू आढळत आहे. गतवर्षी ब्रिटनमध्ये सापडलेला बर्ड फ्ल्यूचा विषाणू रशियन प्रवासी पक्षांच्या मार्फतच येथे आला होता. अर्थात या विषाणूचा माणसांना फारसा धोका नव्हता. मात्र तरीही लांब प्रवास करणार्‍या पक्षांवर सातत्याने नजर ठेवणे आवश्यक आहे. एच फाईव्ह एन आठ विषाणू आढळल्याने गतवर्षीच रशिया, पूर्व आशिया, उत्तर अमेरिका आणि चार युरोपिय देशात लाखो पक्षी ठार करावे लागले होते.

२००६ सालात भारतातही या विषाणूंचा मोठा प्रादूर्भाव झाला होता व २००८ व २०१४ सालातही हा विषाणू भारतात आढळला होता.२०१४ साली यामुळेच केरळ राज्यात लक्षावधी बदके ठार केली गेली आणि राज्यात बर्ड फ्ल्यूसाठी हाय अॅलर्ट जारी केला गेला होता.

Leave a Comment