‘फोर जी’ साठी पोखरली मुंबई

reliance
मुंबई : मुंबईत विविध प्रकारच्या सेवा पुरवणा-या संस्थांकडून रस्त्यांवर चर खणले जात असताना ‘रिलायन्स जिओ इन्फोकॉम’ कंपनीच्या ‘फोर जी’ च्या खोदकामाने जोर धरला आहे. सध्या या कंपनीला पाच किमीपर्यंत खोदकामाला परवानगी दिली जात आहे. परंतु आता चक्क ५०० किमीपर्यंत खोदकामाची एकत्र परवानगी देण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. तसे पत्रच रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने आयुक्तांना पाठवले असून त्यांनी ‘फोर जी’ चे काम जलदगतीने होण्यासाठी एकत्र परवानगी मिळण्याची विनंती केली आहे. मुंबईत सेवा पुरवणा-या कंपन्यांकडून भूमिगत वाहिन्यांसाठी खोदकाम केले जाते. त्यामुळे विविध प्रकारच्या सेवा पुरवणा-या कंपन्यांकडून सध्या अशाप्रकारचे चर खणून सेवावाहिन्यांसाठी पालिकेकडे अर्ज केला जातो. त्याप्रमाणे पालिकेच्या विभाग कार्यालयातर्फे परवानगी दिली जाते. त्यानुसार खणलेले चर महापालिकेतर्फे बुजवले जातात. यासाठी महापालिकेने नव्याने मार्गदर्शक धोरण तयार केले आहे. सर्व ठिकाणचे रस्ते तसेच पदपथ एकाचवेळी खोदकाम करू नयेत, कामाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांना प्राधान्य दिले जाते.

Leave a Comment