सहा दिवसाच्या बालिकेवर हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

heart
लॉस एंजेलिस – अमेरिकेतील रुग्णालयात नुकतीच वेळेआधीच जन्माला आलेल्या आणि अवघे सहा दिवसांचे वय असलेल्या एका बालिकेवर हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. इतक्या लहान वयात हृदय प्रत्यारोपण करण्याची ही पहिलीच शस्त्रक्रिया ठरली आहे.

या बालिकेचे नाव ओलिवर क्रॉफर्ड असे असून, तिच्यावर एरिझोना येथील फिनिक्स चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ओलिवरचा जन्म गर्भनिर्धारण कालावधीच्या सात आठवड्यांआधीच झाला होता. तिला हृदयाशी संबंधित आजाराने ग्रासले असल्याने ती जिवंत राहाण्याची फारशी शक्यता नव्हती.

गर्भातच ही मुलगी जिवंत राहील का, याविषयी तिच्या आई-वडिलांना कोणतीही शाश्‍वती नव्हती. ५ जानेवारीला जन्माला आलेल्या या बालिकेला वाचविण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी हृदय प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी या बालिकेच्या आई-वडिलांना गर्भधारणेच्या २० आठवड्यानंतरच तिला असलेल्या आजाराची माहिती दिली होती. या आजाराला डायलेटेड कार्डियोम्योपॅथी असे नाव आहे. या शस्त्रक्रियेनंतर तिच्या प्रकृतीत आता बरीच सुधारणा झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment