वॉश्गिंटन : फेसबुक वापरणारे युजर्स मद्य आणि त्या संदर्भातील पोस्ट, पेजेस जेवढ्या प्रमाणात लाईक, शेअर किंवा त्यावर कमेंट करतात तेवढ्या प्रमाणात त्या व्यक्ती मद्याचे सेवन करीत असतात, असा एक निष्कर्ष पुढे आलेला आहे. मिशिगन स्टेट विद्यापीठाने याबाबतचे संशोधन केले असून त्यासाठी चारशे लोकांना फेसबुकवर मद्यासंदर्भात येणा-या पोस्टबाबत काय भावना असतात किंवा ते त्याला कसा प्रतिसाद देतात याबाबत विचारणा करण्यात आली. यामध्ये आम्हाला काय आढळले तर जे लोकं फेसबुकवरील मद्यासंदर्भातील गोष्टींच्या मेसेज वाचतात ते लाईक करतात, शेअर किंवा त्यावर कमेंट करतात, त्यामुळे त्यांच्यात मद्यपान करण्याची तीव्र इच्छा निर्माण होते, असे याचे संशोधन करणारे प्राध्यापक सलीम अल्हाबाश यांनी सांगितले. खरे तर मद्यासंदर्भातील माहिती सगळीकडे असते. त्यामुळे मद्यपानाच्या वयाच्या अटीखालील लोकही त्या जाहिराती बघत असतात आणि ते अगदी सहजपणे त्या लाईक आणि शेअर करतात, असे अल्हाबाश यांनी सांगितले.