नासाच्या शास्त्रज्ञांचे संशोधन; धूमकेतू असतो आईस्क्रिमप्रमाणे थंड

dhumketu
कॅलिफोर्निया – अचानक उगवणारा किंवा शेकडो वर्षांनी दिसणारा धूमकेतू या विषयी मानवाला नेहमीच कुतूहल व आकर्षण वाटत आले आहे. हे सारे शब्द आठवल्यावर डोळ्यासमोर येतात ती गॅलिलीओ, कोपर्निकस किंवा आर्यभट्ट यांची नावे. त्यातल्या त्यात महाकाय किंवा शक्तिशाली दुर्बिणीतून दिसणार्‍या धूमकेतूविषयी तर सर्वांनाच जबरदस्त कुतूहल असते. आता त्यात नव्या माहितीची भर पडली आहे. धूमकेतू हा तळलेला किंवा आईस्क्रिमप्रमाणे थंडगार असतो, असे अमेरिकेतील खगोलशास्त्रज्ञांना आढळून आले आहे. पासाडेना, कॅलिफोर्निया येथील नासाच्या जेट प्रोपल्सन प्रयोगशाळेत यासंदर्भात नुकतेच संशोधन करण्यात आले. मूर्ती गुडिपती या शास्त्रज्ञाने धूमकेतूचा हा नवा ‘अवतार’ नासातर्फे घेण्यात आलेल्या छायाचित्रांच्या माध्यमातून जगापुढे आणला. जर्नल ऑफ फिजिकल केमेस्ट्रीमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. धूमकेतूचे स्वरूप समजून घेण्यासाठी हिमालय पर्वतावरील बर्फाच्या थराची व तेथील वैशिष्ट्यपूर्ण संरचनेची मदत घेण्यात आली आहे. धूमकेतूचा अचूक ‘पोत’ निश्‍चित करण्यासाठी याचा शास्त्रज्ञांना उपयोग झाला.

नवीन संशोधनानुसार धूमकेतू आंतरिकदृष्ट्या अतिशय थंड व असुरक्षित असतो. त्याचे कवच अधिक सच्छिद्र असते तसेच शीर्षस्थानी चॉकलेटप्रमाणे थर असतात, असे आढळून आले आहे. वास्तविक धूमकेतूचा पृष्ठभाग मऊ, स्फटिकासमान आणि टणक असतो. मात्र, तो जेव्हा सूर्याच्या अतिनिकट येतो तेव्हा त्याचे ‘वॉटर आईस क्रिस्टल’ मध्ये रूपांतर होते. त्यावेळी याची घनता अधिक असते. नेमके त्याचवेळी कार्बन असलेले परमाणू पृष्ठभागाच्या दिशेने धावतात. मात्र, तेथून त्यांची हकालपट्टी होते कारण त्याचवेळी धूमकेतूच्या पृष्ठभागावर ‘मौसमी’ सेंद्रिय धूळ बसलेली असते. धूमकेतूचा पृष्ठभाग कठीण आणि अंतर्भाग मऊ असतो, हे शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच सांगितलेले नाही घोषित केलेले नाही. गेल्यावर्षीच अधिक काटेकोर परीक्षण आणि प्रयोगाद्वारे शास्त्रज्ञांनी याची खात्री केली आहे. मात्र, धूमकेतु आईसक्रीमसारखा थंड व त्याचा पृष्ठभाग ‘तळल्या’सारखा (डीप फ्राईड) दिसतो, हा शास्त्रज्ञांचा निष्कर्ष आतापर्यंतच्या संशोधनाला नक्कीच कलाटणी देणारा आहे.

Leave a Comment