ब्लॅकबेरीची बीबी १०.३.१ लवकरच रिलीज होणार

blackberry
ब्लॅकबेरी या स्मार्टफोन कंपनीने त्यांची स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम बीबी १०.३.१ असलेल्या स्मार्टफोन १९ फेब्रुवारीला त्यांच्या ग्राहकांसाठी रिलीज करण्याचे ठरविले असल्याचे समजते. मात्र या संदर्भातली अधिकृत घोषणा कंपनीने अद्याप केलेली नाही. ही सिस्टीम ७ फेब्रुवारीलाच रिलीज होणार होती मात्र कांही तांत्रिक अडचणींमुळे ही तारीख पुढे ढकलली गेल्याचे सांगितले जात आहे.

या नवीन ऑपरेटिंग सिस्टीममध्ये पूर्वीच्या कुठल्याच बीबी ओएस मध्ये नसलेली अनेक नवीन फिचर्स दिली गेली आहेत. त्यानुसार नोटिफिकेशन, होम स्क्रीन, अॅप्लीकेशन फिचर्समध्ये बदल केले गेले आहेत. तसेच फोटो आणि बॅटरी बॅकअप क्वालिटी अधिक चांगली केली गेली आहे. त्यासाठी खास कॅमेरा आणि बॅटरी मोड यात नवीन फिचर्स दिली गेली आहेत. ही सिस्टीम कंपनीच्या केवळ नव्या स्मार्टफोनसाठीच आहे की युजर ते पूर्वीच्या स्मार्टफोनसाठीही अपग्रेड करू शकणार आहेत याचाही खुलासा कंपनीने केलेला नाही.

Leave a Comment