मुंबई : फ्लिपकार्टसोबत शाओमी या चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनीने फ्लॅश सेल हा विक्री प्रकार भारतात लोकप्रिय केला. मर्यादित स्टॉकसाठी आठवड्यातून एकदाच पूर्वनोंदणी केलेल्या ग्राहकांना, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धर्तीवर ही विक्री व्हायची. पण आता शाओमी रेडमी नोट ४जी या स्मार्टफोनची विक्री कंपनीने कुठल्याही पूर्व नोंदणीशिवाय करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे तुमच्या सवडीप्रमाणे कधीही फ्लिपकार्टवर तुम्ही हा फॅबलेट विकत घेऊ शकता.
फ्लिपकार्टवर रजिस्ट्रेशनशिवाय मिळणार शाओमीचा रेडमी ४जी !
शाओमी रेडमी नोट ४जी हा फॅबलेट फ्लिपकार्टसोबतच एअरटेलच्या काही निवडक स्टोअर्समध्येही उपलब्ध करून देण्यात आला असून यापूर्वी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे २६ जानेवारीच्या वीकएन्डमध्ये रेडमी ४जी ची खुली विक्री केली होती. त्यामध्ये नेमक्या किती फॅबलेटची विक्री झाली. रेडमी नोट ४जी चा लूक आधीच्या ३जी व्हर्जनप्रमाणेच आहे. या फोनचा स्क्रीन ५.५ इंच ७२० पिक्सेल आयपीएस डिस्प्ले, १३ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि सेल्फी किंवा व्हिडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फॅबलेटचा प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४०० क्वाडकोअर आणि १.६ गिगाहर्ट्झ गतीने प्रक्रिया करणारा आहे. तसेच या फोनचे रॅम २जीबी आहे. या फोनची इंटर्नल मेमरी ८ जीबी तर एसडी कार्डच्या सहाय्याने ती ६४ जीबीपर्यंत वाढवता येते. हा फोन अँड्राईडच्या ४.४ किटकॅट या ओएसवर चालतो तसेच या स्मार्टफोनची बॅटरी ३१०० एमएएच क्षमतेची आहे. फक्त रू. ९९९९ किंमत असलेल्या या स्मार्टफोनमध्ये फक्त एकच सिम बसवण्याची सुविधा आहे.