मुंबई : सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरने आता प्रादेशिक भाषांमध्ये हॅशटॅग सुरु केले असल्यामुळे ट्विटरवर आता मराठीतही हॅशटॅग करता येणार आहे. केवळ इंग्रजीत हॅशटॅग करण्याची आतापर्यंत सुविधा होती. मात्र त्यामुळे ट्विटर युजर्स फक्त इंग्लिशमध्येच नाही तर हिंदी, मराठी, बंगाली अशा सर्व प्रादेशिक भाषांमध्ये हॅशटॅग करु शकतात.
आता प्रादेशिक भाषेत ट्विटरवर हॅशटॅग
हॅश (#) या चिन्हापुढे स्पेस न देता सलग लिहिलेला शब्द म्हणजे हॅशटॅग. एक क्लिकेबल लिंक हॅशटॅग दिल्याने तयार होते. ज्यामुळे तो शब्द हॅशटॅग केलेल्या सर्व पोस्ट एकाच वेळी एका खालोखाल एक अशा पाहू शकतो. एखादा हॅशटॅग जास्तीत जास्त वापरला गेल्यास तो ट्विटरवरील ट्रेण्ड बनतो. हॅशटॅगमध्ये केवळ अक्षरं किंवा अंकाचाच वापर करता येतो. कोणत्याही सिम्बॉलचा (उदा. @, $) हॅशटॅग करता येत नाही.