‘स्वाईन फ्लू’ने राज्यात घेतले ४१ रुग्णांचे बळी

swine
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात ‘स्वाईन फ्लू’ ने थैमान घातले असून राज्यात आतापर्यंत १८६ रुग्णांपैकी जवळपास ४१ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे या आजाराबाबत राज्यात सध्या भीतीचे वातावरण आहे. हा आजार नेमका कशामुळे होतो, याचे कारण काय याबाबत मात्र, जनतेमध्ये संभ्रम अवस्था कायम आहे.आतापर्यंत मुंबईत पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ४ जणांना मधुमेह होता. मुळात मधुमेही रुग्णांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना, याची लागण लवकर होते. त्यातून त्यांचा मृत्यूही ओढावतो.

एवढेच नव्हेतर आतापर्यंत मृत्यू झालेल्या बहुतांश रुग्णांच्या मृत्यूला मधुमेह हे मुख्य कारण असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘स्वाईन फ्ल’ ने मृत्यू होणा-या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे भारतात असून त्यातील बहुतांश रुग्णांना मधुमेह होता, असेही ते म्हणाले. आतापर्यंत नागपूर, औरंगाबाद, नाशिक, आणि मुंबईमध्ये अधिक रुग्ण आढळले आहेत. याशिवाय राजस्थान, गुजरात, तेलंगणा या शहरात स्वाईन फ्लूचा प्रसार व्हायला सुरुवात झाली आहे. तेथेही अनेक रुग्णांना मधुमेह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment