सूरतमध्ये बनत आहेत रतनजडित जोडे

shoses
सूरत – सोने-चांदी किंवा हिरे यापासून दागिने बनविण्याची पद्धत पारंपरिक आहे. मात्र, गेल्या काही वर्षात हौशी आणि श्रीमंत लोक हिरेजडित मोबाईल, पेन ड्राईव्ह आणि बेल्टही वापरत आहेत. यातच दुबईतील एका धनाढ्याने हिरेजडित जोडे बनविण्याचे कंत्राट सूरतमधील कारागिरांना दिले आहे.

हे जोडे बनवित असलेल्या दागिन्यांच्या दुकानाचे मालक दिलीप शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हे जगातील सर्वात महागडे जोडे ठरणार आहेत. प्रत्येक जोड्याला सहा हजार याप्रमाणे दोन्ही जोड्यांना मिळून तब्बल १२ हजार हिर्‍यांनी चमकणारे हे जोडे दोन महिन्यात तयार होणार आहेत. जोड्यांमध्ये दागिना घडविण्याचा हा आमचा पहिलाच प्रयोग आहे.’ काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील एका ग्राहकासाठी जोड्यांची लेस लावण्याच्या हिरेजडित क्लिप्स तयार करण्यात आल्या होत्या आणि त्यात ३०० पेक्षा जास्त हिरे लावण्यात आले होते.

Leave a Comment