नासा सोडणार १४ नॅनो उपग्रह

nano-sate
अंतराळ संशोधन क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावत असलेली अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था पुढच्या वर्षापासून म्हणजे २०१६, २०१७ आणि २०१८ अशा तीन वर्षात १४ नॅनो उपग्रह प्रक्षेपित करणार असल्याचे वृत्त आहे.

हे लघु उपग्रह हातात मावतील इतक्या छोट्या आकाराचे आहेत. पुढील वर्षापासून जी रॉकेट लाँच केली जातील त्यातून हे उपग्रह प्रक्षेपित केले जाणार आहेत. हे उपग्रह क्यूब म्हणजे चौकोनी आकाराचे असून त्यांचे नामकरण क्यूबसेट असे केले गेले आहे. अवघ्या चार इंचाच्या या उपग्रहाचे वजन ३ पौंड म्हणजे दीड किलोपेक्षाही कमी आहे. या उपग्रहांच्या विकासासाठी अमेरिकेतील १२ राज्यातील विश्वविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि नासाच्या स्थानिक केंद्रांचे सहाय्य घेतले गेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या उपग्रहांच्या सहाय्याने सौर अभ्यास आणि भविष्यातील विज्ञान योजनांवर संशोधन केले जाणार आहे.

Leave a Comment