सॅमसंगचा स्मार्ट टीव्ही ऐकणार आवाज

smarttv
सॅमसंगने नेक्स्ट जनरेशन स्मार्ट टिव्ही बाजारात आणला असून हा टिव्ही दर्शकाचा आवाज ऐकू शकतो तसेच दुसर्‍याबरोबर हा आवाज शेअरही करू शकतो. परिणामी सॅमसंगने या टिव्ही समोर बोलताना सावधानता बाळगा असा संदेश ग्राहकांना दिला आहे.

या टिव्हीत व्हॉईस कमांड तंत्राचा वापर करण्यात आला आहे. यामुळे टिव्ही सुरू असताना तो आसपासचे आवाज ऐकतो, थर्ड पार्टी सॉफ्टवेअरच्या सहाय्याने हे आवाज टेक्स्ट मध्ये बदलले जातात आणि परत टिव्ही कडे कमांड स्वरूपात पाठविले जाऊ शकतात. यामुळे टिव्हीतील कार्यक्रम पाहताना आपल्या आवाजानुसार कार्यक्रम युजरला बदलता येतात. मात्र यात इंटरनेटचा संबंध असल्याने ग्राहकाच्या खासगी बाबीही सार्वजनिक होण्याची चिंता ग्राहकांना वाटते आहे. सॅमसंगनेही आमचा टिव्ही तुमच्या व्यक्तीगत गोष्टीही ऐकू शकतो तेव्हा थोडी सावधानता बाळगा असे अगोदरच जाहीर केले आहे.