दक्षिण कोरियाची इलेक्ट्रोनिक कंपनी सॅमसंगने त्यांचा नवीन बजेट स्मार्टफोन गॅलेक्सी जे वन भारतात लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. वास्तविक जानेवारी २०१५ मध्येच हा फोन सादर केला गेला आहे आणि सध्या तो फकत अॅमेझॉनवरच विक्रीसाठी उपलब्ध आहे. या फोनची किंमत ७१९० रूपये आहे.
सॅमसंगचा बजेट स्मार्टफोन गॅलेक्सी जे वन लॉच
या स्मार्टफोनसाठी ४.३ इंची वेगा डिस्प्ले,५१२ एमबी रॅम, अँड्राईड किटकॅट ४.४ ओएस, ४ जीबी मेमरी, मायक्रो कार्डने मेमरी वाढविण्याची सुविधा, ५ एमपीचा ऑटो फोकस्ड प्रायमरी कॅमेरा, एलईडी फ्लॅश, २ एमपीचा फ्रंट कॅमेरा, पाम सेल्फीसह अनेक सेल्फी फिचर्स, थ्रीजी, वायफाय, ब्ल्यू टूथ, जीपीएस कनेक्टीव्हिटी अशी फिचर्स दिली गेली आहेत.