राजकोट : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचे पानिपत झाल्यामुळे मोदींची लाट ओसरल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र याला अपवाद ठरत आहेत मोदींच्या गुजरातमधील कार्यकर्ते. येथील कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दलचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. नरेंद्र मोदींच्य़ा कार्यकर्त्यांनी राजकोट जिल्ह्यात चक्क मोदींचे मंदिर उभारले आहे.
भाजप कार्यकर्त्यांनी राजकोटमध्ये उभारले मोदींचे मंदिर
या मंदिराचे काम रिसातील कारागिरांनी केले असून गळ्यात भाजपचा उपरणे असलेली मोदींची मूर्ती या मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवण्यात आली असून मंदिराच्या कळसावर भाजपचे फिरणारे कमळ आहे.
मंदिरात दररोज जवळपास शंभर लोक दर्शनाला येतात. शिवाय असे मंदिर प्रत्येक गावात व्हायला हवे, असे मंदिर उभारणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री मोहन कुंदारिया यांच्या हस्ते या मंदिराचे उद्धाटन येत्या १५ फेब्रुवारीला होणार आहे.