मराठा आरक्षणामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द

arkashan
पुणे : ज्या महाविद्यालयात मराठा आरक्षणानुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशही देण्यात आले ते न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे आता रद्द करण्यात येत आहेत. पिंपरी चिंचवड मधल्या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांचे प्रवेश याच कारणांमुळे रद्द करण्यात आले आहेत.

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण ऑगस्ट २०१४ मध्ये शिक्षण क्षेत्रात जाहीर करण्यात आले होते, त्यासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशानुसार एका महिन्याची मुदत देऊन, वैध जातप्रमाणपत्र दाखल करण्याचे मुभा देण्यात आली होती. त्यानुसार महाविद्यायालयांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेतले होते, मात्र मधल्या काळातील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक आचारसंहितेमुळे मराठा आरक्षणाच्या मुद्याची पूर्तता सरकार करू शकले नाही आणि त्याच दरम्यान, उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड मधल्या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांचे प्रवेश याच कारणांमुळे रद्द करण्यात आले आहेत.

Leave a Comment