डीड डॉप्स प्रोजेक्ट- फाईल शेअरिंगचा नवा फंडा

did-drops
जर्मन मिडिया आर्टिस्ट एरम बार्थोल याने आक्टोबर २०१० मध्ये सुरू केलेल्या अनोख्या डीड डॉप्स प्रोजेक्टची घोडदौड अतिशय वेगाने सुरू झाली असून जगात आता हा प्रोजेक्ट १२१८ लोकेशन्सवर पोहोचला आहे. या अनोख्या प्रोजेक्टमध्ये यूएसबी फ्लॅश ड्राईव्ह भिंतीत बसविले जातात आणि तेथे युजर आपल्या फायली अपलोड करणे, शेअर करणे, कॉपी करणे अशी कामे करू शकतात. विशेष म्हणजे हे ऑफलाईन नेटवर्क आहे.

नेटवर्कमध्ये हवा असलेला डेटा भिंतीत, कुलपात बसविलेल्या या यूएसबी मध्ये युजर लोड करू शकतो. त्यासाठी लॅपटॉप, स्मार्टफोन यांचाही वापर करता येतो. ६४ एमबी स्पेसने या प्रकल्पाची सुरवात करण्यात आली होती ती स्पेस आता १२८ एमबी पर्यंत पोहोचली आहे. जगात कुठेही ही यएसबी पोर्ट बसविता येतात. कांहीजणांनी या प्रकल्पाचे वर्णन स्पाय प्रोजेक्ट असे केले आहे. मात्र एरम च्या मते इंटरनेट याच पद्धतीने काम करते. आम्ही जे कांही करतो त्याची सरकारला पूर्ण माहिती आहे.

या यूएसबीच्या माध्यमातून युजर गाणी, फोटो, पेंटींग्ज, व्हिडीओ गेम्स, टिव्ही शो, कॉमिकस असा कोणताही कंटेट अपलोड करू शकतात आणि फाईल शेअर करू शकतात. याचा डेटाबेसही उपलब्ध आहे. त्यामुळे यूएसबी फ्लॅश ड्राईव्ह कुठे आहे त्याचे लोकेशनही समजू शकते. स्वायत्त फाईल शेअरिंग नेटवर्क असे त्याचे स्वरूप आहे.

Leave a Comment