जगातला पहिला उबंटू स्मार्टफोन आला

ubantu
अँड्राईड आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टीमना टक्कर देण्यासाठी उबंटू ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारा जगातला पहिला स्मार्टफोन युरोपमध्ये दाखल झाला आहे. लायनेक्सवर आधारित डिव्हायसेस ओएस उबंटचा वापर क रण्यात आलेल्या या पहिल्या स्मार्टफोनचे नांव आहे बी क्यू अक्वारिस ई ४.५. या फोनची युरोपात विक्री सुरू झाली असून अनेक अॅप्स आणि सहज वापरता येणारी सेवा यामुळे हा फोन आणि ही ऑपरेटिंग सिस्टीम बाजारात हिट होईल असा तज्ञांचा अंदाज आहे.

या फोनसाठी ४.५ इंचाचा क्यूएचडी स्क्रीन दिला गेला आहे. हा स्क्रीन एचडी पेक्षा चौपट चांगले रिझोल्युशन देणारा स्क्रीन आहे. फोनला क्वाडकोर मिडीया टेक प्रोसेसर, मल्टी टास्कींगसाठी १ जीबी रॅम, ८ एमपीचा रियर तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा अशी अन्य फिचर्स दिली गेली आहेत. फोनच्या किमती समजू शकलेल्या नाहीत.

Leave a Comment