आयफोन सिक्सपेक्षा सुपर बिग कोला थ्री?

big-cola
आयफोनला जगभरातील ग्राहकांकडून मिळत असलेली पसंती पाहता आयफोनसारखे दिसणारे, आयफोनचे डुप्लीकेट असे स्मार्टफोन बाजारात दररोज नव्याने दाखल होत आहेत. मात्र चीनचा डाकेल थ्री अथवा बिग कोला थ्री नावाने बाजारात येत असलेला आयफोनशी साधर्म्य असलेला स्मार्टफोन खरेाखरच आयफोन सिक्सपेक्षाही सुपर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यांचा दावा कांही अंशी खराही मानला जात आहे.

या स्मार्टफोनसाठी सफायर स्क्रीन दिला गेला असल्याचे समजते. आयफोन सिक्ससाठीही सफायर स्क्रीनची अफवा जोरात होती. बिग कोला ऑक्टाकोर १.७, ३ जीबी रॅम सह येत असून आयफोन सिक्ससाठी आक्टाकोर १.५ व रॅम १ जीबीची आहे. पाच इंची स्क्रीन असलेल्या बिग कोलाची पिक्सल डेन्सिटीही आयफोन सिक्सपेक्षा अधिक चांगली आहे. या फोनला १३ एमपीचा रियर तर ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला असून तो अँड्राईड फोन आहे. आयफोनपेक्षाही सरस फिचर्स असलेला हा फोन केवळ १५ हजारात उपलब्ध करून दिला जात असल्याचीही चर्चा आहे.

Leave a Comment