आता एड्सची माहिती स्मार्टफोनवर

dongle
वॉशिंग्टन : अवघ्या १५ मिनिटांमध्ये एड्स तसेच लैंगिक रोगांचे पेशंट ओळखू शकणारे स्मार्टफोन डोंगल विकसित करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. माणसाच्या बोटातून रक्ताचे नमुने घेतल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांमध्ये हे डोंगल रोगाचे निदान करू शकेल. कोलंबिया युनिव्हर्सिटीतील ‘स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अ‍ॅप्लाइड सायन्स’ मधील शास्त्रज्ञांच्या गटाने हे संशोधन केले. सॅम्युअल के सिया यांच्या मार्गदर्शनाखाली हे डोंगल विकसित करण्यात आले. वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये एड्सचे निदान होण्यासाठी कराव्या लागणा-या सर्व चाचण्या या डोंगलच्या साह्याने करता येऊ शकतात, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. एड्सचे निदान करण्यासाठी कराव्या लागणा-या चाचण्या ‘एलिसा’ या नावाने ओळखल्या जातात. या एलिसा चाचण्या आतापर्यंत एका उपकरणाने करता येणे शक्य नव्हते.

Leave a Comment