राज्यात स्वाईन फ्लूने पसरले पाय

swine
मुंबईः स्वाईन फ्लूचा धोका मुंबईसह महाराष्ट्रात वाढला असून विविध रुग्णालयात २५० पेक्षा जास्त रुग्ण दाखल आहेत. एकट्या नागपूरमध्ये आतापर्यंत १३, तर लातूरमध्ये दोघांचा बळी गेला असून पालघरमध्येही एका रुग्णाला आपला प्राण गमवावा लागला. नागपुरात ३० जणांवर उपचार सुरू असून, लातूर जिल्हा रुग्णालयात बुधवारपर्यंत पाच संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. पालघरमध्ये आणखी चार जण अत्यवस्थ असल्याचे समोर आले आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी ही माहिती दिली आहे. देशात एकाच महिन्यात स्वाईन फ्लूचे २०० बळी गेले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एका उच्चस्तरीय बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला आणि या आजारावर नियंत्रण आणण्यावर चर्चा करण्यात आली.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment