कूलपॅड इव्वी के १ मिनी- सर्वात सडपातळ स्मार्टफोन

ovvi
जगातील सर्वाधिक सडपातळ स्मार्टफोन म्हणून कूलपॅड इव्वी के १ मिनी स्मार्टफोनने नवीन रेकॉर्ड नोंदविले आहे. विवो एक्स ५ मॅक्स या जगातील सर्वात सडपातळ म्हणून गणल्या गेलेल्या स्मार्टफोनलाही त्याने मागे टाकले आहे. के १ मिनीची जाडी आहे फक्त ४.७ मिमि. चीनी बाजारपेठेत हा फोन सादर झाला असून त्याची किंमत आहे २०७ अमेरिकन डॉलर्स.

हा फोन एक्स फाईव्ह मॅक्सपेक्षाही अर्धा मिमी कमी जाडीचा तर आप्पो आर फाईव्ह पेक्षा दीड मिमी कमी जाडीचा आहे. हा स्मार्टफोन हायएंड फोन नाही. त्याला ४.७ इंची टचस्क्रीन, ८एमपीचा रियर कॅमेरा, ५ एमपीचा फ्रंट कॅ मेरा, १ जीबी रॅम, क्वालकॉम स्नॅनड्रॅगन ४१०, ८ जीबी स्टोरेज व फोर जी एलईडी स्पीड अशी फिचर्स दिली गेली आहेत. जगातील अन्य बाजारपेठांतून तो कधी दाखल होणार याविषयी कोणतीही माहिती दिली गेलेली नाही.

Leave a Comment