जेरूसलेम : मोबाईल फोनवर अनेक जीवाणू असतात, त्यामुळे तो जीवाणूजन्य रोगांना कारणीभूत ठरू शकतो हे खरे असले तरी आता वैज्ञानिकांनी स्मार्टफोनचा वापर रोगनिदानसाठी करण्याचे ठरविले आहे. संशोधकांनी प्राणघातक रोगांचे निदान करू शकणारे स्मार्टफोन तयार करता येतील, असे नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यात ब्रेथ अॅनॅलायझर व स्मार्टफोन यांच्या तंत्रज्ञानाचा मिलाफ करून स्निफ फोन तयार करण्यात यश आले आहे.
रोगनिदानसाठी ‘स्निफफोन’ तंत्रज्ञान विकसित
टेकियॉन-इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेचे प्राध्यापक होसम हाईक यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले आहे. त्यात स्मार्टफोनचा वापर रोगनिदानसाठी करता येतो, अर्थात या संशोधनाची ही प्राथमिक अवस्था आहे. स्मार्टफोन हा जर एका विशिष्ट तंत्रज्ञानासमवेत वापरला तर वापरकत्र्यांच्या श्वासावरून रोगांचे निदान करता येते. त्यामुळे या फोनला स्निफफोन असेही म्हटले आहे.
यात स्निफफोन प्रकल्पात हाईक यांनी तयार केलेले श्वास विश्लेषक यंत्र स्मार्टफोनला जोडले जाते व त्यामुळे शरीराला कुठेही छेद न देता चटक्न व स्वस्तात रोगनिदान करता येते.
या ब्रेथअॅ नॅलायझर म्हणजे श्वासविश्लेषकात सूक्ष्म व अतिसूक्ष्म संवेदक वापरलेले असून ते बाहेर टाकलेल्या श्वासातील घटकांचे विश्लेषण केले जाते व ती माहिती मोबाईल फोनला दिली जाते व त्यातील संस्कारकाच्या मदतीने माहितीचे विश्लेषण केले जाते.
या संशोधनासाठी ६८ लाख अमेरिकी डॉलरचे अनुदान दिले आहे. यात इलेक्ट्रोनिक नाकासारखे काम करणारे ब्रेथ अॅ्नॅलायझर (श्वास विश्लेषक) तंत्रज्ञान २००६ पासून विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे सामान्य लोकांनाही श्वासाच्या मदतीने रोगांचे निदान करता येते व त्यावर उपचार करणे सोपे जाते. सिमेन्स जर्मनी, ऑस्ट्रिया, फिनलंड, आर्यलंड व लॅटव्हिया व इस्रायली कंपनी नॅनोव्हेशन-जीएस इस्रायल यांनी यात सहभाग घेतला होता. स्निफफोन हा अंतिम रूपात स्वस्त व आकाराने लहान केला जाणार असून, त्यामुळे रोगांचे निदान करणे शक्य होणार आहे, असे हाईक यांनी सांगितले. कुठल्याही रोगाचे निदान लवकर झाल्यास तो बरा करणे सोपे जाते. कर्करोगासारखे प्राणघातक रोगही यातून बरे करता येतात, असा दावा हाईक यांनी केला आहे.