‘सेल्फी’ क्रेझींसाठी ‘लेनोवो सिसली एस९०’

lenova
मुंबई : हुबेहूब ‘आयफोन ६’सारखा दिसणारा ‘लेनोवो सिसली एस९०’ हा फोन नुकताच भारतात लॉन्च करण्यात आला आहे. ‘सेल्फी’ क्रेझींसाठी हा फोन म्हणजे पर्वणीच ठरणार असून या फोनमध्ये फ्रंट कॅमेराच ८ मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. हा मोबाईल अजूनही तुम्हाला लेनोवो इंडियाच्या वेबसाईटवर किंवा ई-कॉमर्सच्या वेबसाईटवर तुम्हाला सापडणार नाही. पण, रिटेलर्सजवळ मात्र या स्मार्टफोन्सचा स्टॉक येणे सुरु झाले आहे.

‘लेनोवो सिसली एस९०’चे काही फिचर्स – * स्क्रीन : ५ इंचाचा सुपर अमोल्ड स्क्रीन, मल्टिटच सपोर्ट स्क्रीन * डिस्प्ले : एच डी क्वॉलिटी डिस्प्ले (७२०*१२८० पिक्सल रिझोल्युशन) * प्रोसेसर : १.२ गीगाहर्टझ (कॉर्टेक्स A५३ क्वाड-कोर प्रोसेसर)* रॅम : १ जीबी किंवा २ जीबी * इंटरनल मेमरी : १६ जीबी आणि ३२ जीबी * रिअर कॅमेरा : १३ मेगापिक्सल (ऑटोफोकस, एलईडी फ्लॅशसहीत) * फ्रंट कॅमेरा – ८ मेगापिक्सल * ड्युएल सिम फोन (ड्युएल स्टँडबाय फिचरसहीत) * ऑपरेटिंग सिस्टम : अँन्ड्रॉईड ४.४.४ किटकॅट * वजन : १२९ ग्रॅम * सिम : माइक्रो सिम * बॅटरी : २३०० मेगाहर्टझ पॉवरची बॅटरी

चीनी बाजारात हा फोन नोव्हेंबर महिन्यात लॉन्च करण्यात आला होता. याची किंमत जवळपास २०,००० रुपये होती. भारतीय बाजारात हा फोन जवळपास त्याच किंमतीत १९,९९० रुपयांत उपलब्ध आहे.

Leave a Comment