भारतात होणार शाओमीच्या स्मार्टफोन्सची निर्मिती!

xiaomi
मुंबई – युवा पिढीवर आपल्या स्मार्टफोन द्वारे अधिराज्य गाजवत असलेले आणि फक्त ई-कॉमर्सच्या माध्यमातून मिळणारे शाओमी हे चायनीज स्मार्टफोन आता भारतात तयार होणार असून चीनमध्ये सध्या या स्मार्टफोनची निर्मिती होते. चीनमधून भारतात आयात केल्यानंतर भारतात त्यांची विक्री होते.

भारतात अल्पावधीतच शाओमीचे एमआय फोन आणि रेडमी नोट लोकप्रिय झाले आहेत. दर मंगळवारी ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर होणाऱ्या फ्लॅश सेलमुळे शाओमी फोन चर्चेचा विषय बनला. आता शाओमीने एमआय४ हा स्मार्टफोनही भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये असलेल्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सच्या तुलनेत शाओमी फोनची किंमत यामुळे त्याला खूप प्रतिसाद मिळाला.

आता आलेल्या वृत्तानुसार, चेन्नईमध्ये शाओमी एक स्मार्टफोन प्रॉडक्शन युनीट भाडेतत्वावर घेऊन भारतातच शाओमी फोनची निर्मिती करणार आहे. सप्टेंबर किंवा डिसेंबर २०१५ पर्यंत शाओमी फोन्सची निर्मिती चेन्नईच्या नोकिया युनिटमधून होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment